ram-kadam.jpg 
मुंबई

"कोरोनामुळे होणारे मृत्यू म्हणजे ठाकरे सरकारने केलेल्या हत्याच"

दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पश्चिमेचे भाजपाचे आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेला वैद्यकीय साधनांचा तुटवडा आणि लॉकडाउनच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे.

"महाराष्ट्रात एक वर्षापूर्वी ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. आज  एकवर्षानंतरही वसुली सरकारला बेड, औषध या सुविधा निर्माण करता आलेल्या नाहीत. लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. स्मशानभूमीत रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारासाठी लोकांना तासनतास थांबावं लागतय. एकवर्ष या सरकारकडे होतं. तुम्ही झोपा काढत होता का?" अशा शब्दात आघाडीवर सरकारवर संताप व्यक्त केला आहे.  

"ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होत आहे. तीन पक्षांच्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू होतायत. हे मृत्यू नाहीत. तीन पक्षांनी मिळून केलेली  ती हत्या आहे. सिंहासनावर बसून दायित्वाचं निर्वाहन करायचं असतं. कसायाचं काम करायच नसतं" अशी टीका राम कदम यांनी केली.  

"लोकतंत्राच्या नावाखाली लॉकतंत्र सुरु केलय. कोरोनामुळे आजारी आहे, तर बेड नाही म्हणून हॉस्पिटलच्या दारात मरायचं आणि  लॉकतंत्रामुळे लोकांनी घरी तडफडून मरायचं. कुठे आहे तुमच पॅकेज ?" असा सवाल त्यांनी केला. "शिवथाळी सरकार मोफत देणार, पण कडक संचारबंदी लागू असताना लोक शिवथाळी खायला जाणार कसे?" असा सवाल राम कदमांनी विचारला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT